अजून यौवनात मी नि दंग जीवनात या
प्रसाद ही प्रमाद ही प्रमोद आणखी तया
अरे कशास जीवना विचार आणसी मना
उदंड आज आजची उद्याची तीही आण ना
पुरे भरावयास पात्र हे नको करू कमी
तिथे सदा अतृप्त मी
प्रसन्न चित्त हासते बघुनिया मजेस त्या
फुलात फूल होत मी फुलात भृंग होत त्या
भरोत रंग बैठकीत स्नेह सोबतीत मी
प्रियेस प्रेम होत मी